Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रातिनिधिक स्वरुपात रथ ओढून पिंप्राळा रथोत्सव साजरा (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  १४६ वर्षाची परंपरा असलेला प्रतिपंढरपूर रथोत्सव जानकाबाई की जय या जयघोषाने पिंप्राळा येथे साजरा करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरुपात पाच पावले रथ ओढवून रथोत्सव रद्द करण्यात आला. 

कोविडचा संसर्ग बघता शासनाच्या निर्देशाप्रमाणे भजनी मंडळ, विश्वस्त व मान्यवर  ग्रामस्थ,  भाविकांना सनीटाइझ करून यांना  दर्शनासाठी मंदिरात प्रवेश  देण्यात आला.  शासकीय आदेशानुसाररथाची महापूजा व महाआरती करून पाच पावले पुढे ओढून प्रातिनिधिक व साध्या स्वरुपात रथोत्सव साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल मंदिरात सकाळी साडेपाच वाजता विश्वस्त रुपेश विलास वाणी सपत्नीक यांच्या हस्ते महाअभिषेक करून श्री विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्यात आली. तसेच रथावरील मूर्ती हनुमान, अर्जुन, गरुड, घोडे यांची विधिवत पूजा अभिषेक विश्वस्त संजय प्रभाकर वाणी सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आली.  यावर्षी  रथाची महापूजा सकाळी आठ वाजता रथोत्सव समिती अध्यक्ष अनिल पुरुषोत्तम वाणी सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आली.  रथाची महाआरती सकाळी ८.१५ वाजता स्थानिक ग्रामस्थ मंडळी, नगरसेवक, शांतता कमिटी सदस्य ,वाणी समाज प्रतिनिधी अक्षय प्रमोद वाणी, कल्पेश सोमनाथ वाणी, मोगरी लावणारे, स्वयंसेवक, पुजारी श्याम जोशी व भजनी मंडळ अरुण पाटील, रमेश महाजन  यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी माजी पोलीस पाटील विष्णू पाटील,  शांतता कमिटी सदस्य  संजय सोमाणी,  माजी नगरसेवक आबा कापसे,  नगरसेवक मयूर कापसे, नगरसेवक विजय पाटील, शांतता कमिटी सदस्य अतुल बारी, शांतता कमिटी सदस्य शशिकांत साळवे,  शांतता कमिटी सदस्य पुरुषोत्तम सोमाणी,  मोगली लावणारे स्वयंसेवक पीतांबर देवाजी कुंभार,  मोगरी लावणारे स्वयंसेवक अध्यक्ष, मोहनदास वाणी,  उपाध्यक्ष  सुनील वाणी, सेक्रेटरी  योगेश चंदनकर श्री विठ्ठल मंदिर संस्थान यांच्या उपस्थित करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक  व साध्या स्वरुपात रथाची पूजा करून रथोत्सव यात्रा रद्द करण्यात आली.

 

भाग १

भाग २

Exit mobile version