Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्राणवायु निर्मिती प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करावे – जिल्हाधिकारी

बुलडाणा, प्रतिनिधी । सक्रीय रूग्णांची लक्षात घेता प्राणवायूची गरज भविष्यातही अशाच पद्धतीने लागणार आहे. त्यामुळे स्थानिक सामान्य रूग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प असणे गरजेचे आहे. तरी या प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करून रूग्णांच्या सेवेत रूजू करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी आज खामगांव सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आढावा बैठकही घेतली. बैठकीत आढावा घेतांना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी  रूग्णालयातील कोविड वार्ड, डायलेसीस विभाग, पाकगृह, कोविड प्रयोगशाळा व नव्याने प्रस्तावित प्राणवायू प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी वैदयकीय अधीक्षक यांचे दालनात अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसीलदार सुरेखा जगताप, न. प. मुख्याधिकारी आकोटकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, तालुका वैदयकीय अधिकारी दिनकर खिरोडकर, डॉ. सोनटक्के आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चाचण्या वाठविण्याचे निर्देश दिले. कोरोना चाचणी, विलगीकरण कक्ष व इतर सुविद्या रूणांना पुरविण्यासाठी आवश्यक सुविधा नागरिकांकडून लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले. रूग्णालयात प्राणवायू प्रकल्पाचे काम सध्या सुरु आहे. या कामाची पाहणी त्यांनी केली. येथील रुग्णालयात आरटीपीसीआर प्रयोगशाळा सुरु करण्यात येत आहे. त्याचा आढावा देखील त्यांनी घेतला. शोध, उपचार आणि लसीकरण या त्रिसूत्रीवर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासही त्यांनी सांगितले. याशिवाय सामान्य रुग्णालयाला जर काही अडचणी, समस्या असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version