Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्राचार्यांनी काढलेल्या ‘त्या’ परिपत्रकाचा महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून निषेध

 

 मुक्ताईनगर, प्रतिनिधी  ।   शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांवरील दडपशाही करणाऱ्या परिपत्रकाचा महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून  निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयच्या प्राचार्यांनी हे परिपत्रक मागे घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव यांनी ७ एप्रिल २०२१ रोजी एक परिपत्रक काढले होते. त्यामध्ये त्यांनी नमूद केलेले आहे की, मंत्री व वरिष्ठ यांच्याकडे तक्रार करू नये व केल्यास आपल्यावर कार्यावाही करण्यात येईल व कारवाईच्या परिणामांना विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील असे नमुद केलेले आहे. यावर महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे . कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ऑनलाईन निवेदन मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांना पाठविण्यात आले असल्याचे अॅड. अभिजीत रंधे यांनी सांगितले.

या सर्व प्रकरणाची माहिती जिल्हा सचिव रोहित काळे यांनी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन च्या बाकी पदाधिकाऱ्यांना सांगितले आणि तात्काळ प्राचार्य यांच्याशी संपर्क साधले.

संबधीत परिपत्रक रद्द करण्यात आले असुन आम्ही विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करित असतो – डॉ. रा. द. कोकाटे – प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव

प्राचार्य यांनी प्रकट केलेले परिपत्रक दडपशाही ला पुरस्कृत करते आणि आम्ही ह्या परिपत्रकाचा जाहीर निषेध नोंदवत आहोत. तसेच सदर परिपत्रक रद्दबातल न केल्यास महाराष्ट्र स्टुडंन्ट्स युनियनकडुन संपुर्ण महाराष्ट्रभर संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन खान्देश विभाग प्रमुख अॅड. अभिजीत रंधे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, यांनी पाठवले आहे.

Exit mobile version