Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रांताधिकार्‍यांनी केली सहा सहाय्यक नोडल ऑफिसर्सची नियुक्ती

रावेर प्रतिनिधि । रावेर,सावदा, व न्हावी येथील कोविड सेंटरला प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी साहाय्यक नोडल ऑफिसरची आज नेमणुक केली आहे. हे सर्व नोडल ऑफिसरला मदत करणार आहे.

यामध्ये समाज कल्याण मुलांचे वसतीगृह येथील कोविड सेंटरला सहाय्यक अभियंता इमरान शेख यांची नेमणुक करण्यात आली आहे. व्हि. एस. नाईक महाविद्यालय येथे शाखा अभियंता व्हि. के. तायडे, आदिवासी मुलांचे वसतीगृह येथे सहाय्क अभियंता गणेश भुगरे, कुसुमताई मंगल कार्यालय व नगर पालिका सावदा येथे सह अभियंता मनोहर तायडे,जे. टी. महाजन वसतीगृह न्हावी येथे सुमित पाटील व अजित निंबाळकर यांची नेमणुक केली असून हे सर्व नोडल ऑफिसर यांच्या मार्गदर्शना खाली कोविड सेंटरला मदत करणार आहेत.

Exit mobile version