Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रशिक्षण पूर्ण नसेल तर लाभ नाहीत ?

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – कोरोना संसर्ग प्रादुर्भाव काळात अनेक आशा स्वयंसेविका गटप्रवर्तकाना सेवेत रुजू करून घेण्यात आले. परंतु ज्या आशा गटप्रवर्तकांचे प्रशिक्षण नसलेल्याना वाढीव मानधन, प्रोत्साहन भत्ता देऊ नये, असे आदेश आरोग्य संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे प्रशिक्षण नसलेल्या आशा गटप्रवर्तकांना या लाभापासून वंचित राहावे लागणार असल्याचे चित्र  आहे.

संसर्ग प्रादुर्भाव काळात आरोग्य विभागाला पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध झालेला नाही. तसेच संसर्ग काळात पहिल्या लाटेपेक्षा २०२१ दरम्यान आलेली दुसरी लाट मोठ्या प्रमाणात होती. याच काळात बहुतांश जिल्ह्यांमध्ये विशेषत: शहरी भागात आशासेविका गटप्रवर्तकांची आवश्यकता होती. त्यामुळे आशासेविका आणि गटप्रवर्तकांना हे प्रशिक्षण न देता प्रशासनाने नव्या आशासेविका आणि गटप्रवर्तकाना रुजू करून घेतले. आशा गटप्रवर्तक महिलांना वैद्यकीय प्रशिक्षण देणे अपेक्षित होते. जिल्हा प्रशासनाकडूनदेखील प्रशिक्षणासाठी निधी न मिळाल्याने आशा आणि गटप्रवर्तकांना प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि आरोग्य विभागाच्या नव्या आदेशामुळे यांना फटका बसला आहे.

संसर्ग प्रादुर्भाव काळात नागरीकाना मागर्दर्शन तसेच जोखमीचे काम करण्यासाठी आशासेविकांना २०२१ पासून मार्च २०२२ पर्यंत तीन हजार रुपये प्रति महिना वाढीव मानधन तसेच या व्यतिरिक्त ५०० रुपये प्रोत्साहन भत्ताही देण्याचे राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जाहीर झाले आहे. संसर्ग प्रादुर्भाव काळात रुजू झालेल्या आशासेविकांना मोबदला अदा करण्यासाठी किमान प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे अनिवार्य असून ज्या आशासेविकांचे प्रशिक्षण झालेले नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन देता येणार नाही. आशा आधी रुजू झालेल्या असल्या परंतु त्यांचे प्रशिक्षण नंतर झाले असल्यास प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तारखेपासूनच मानधन द्यावे, असे राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकानी आदेश आहेत.

Exit mobile version