Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रशासनाच्या चुकीमुळे कुटुंब शासकीय लाभापासून वंचित

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोना विषाणूने मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य शासनाने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, प्रशासनाच्या तांत्रिक चुकीमुळे परसाडे येथील कोरोना विषाणूने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, या कुंटुंबाला तांत्रीक अडचणींच्या गोंधळामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचीत राहावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की , यावल तालुक्यातील कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटकाळात सुमारे १३० हुन अधिक नागरीकांनी आपला जिव गमावला आहे. परसाडे तालुका यावल येथे राहणारे भागवत सावळे यांचा देखील दि. १० एप्रिल २o२१ रोजी कोरोना पॉझीटीव्ह आल्याने जळगाव येथील शासकीय कोवीड रुग्णालयात मृत्यु झाला. यावेळी विविध प्रशासकीय यंत्रणेकडून गाव पातळीपासून तर शहरी विभागातून कोरोनामुळे मरण पावलेले ल्यांची संपुर्ण माहीतीसह आकडेवारी घेण्यात आली. दरम्यान, परसाडे येथील रहीवासी भागवत सुपडू सावळे (वय ५५ वर्ष) यांचा देखील या काळातकोरोनामुळे मृत्यु झाला. त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले. दुर्दैवाने त्यांचे दि. १o एप्रिल २०२१ रोजी मृत्यु झाला. मात्र त्यांना यावलच्या ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आल्याची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्य होईल का नाही याबाबत मात्र शंका निर्माण झाली आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी यांनी यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. बी. बी. बारेला यांनी या विषयी माहीती दिली. यात डॉ. बारेला यांनी सांगितले की, कोरोना काळात संसर्गामुळे मरण पावलेल्यांची नावांची नोंद स्थानिक महसुल प्रशासन यंत्रणेकडुन करण्यात आली. त्यामुळे सदरच्या मरण पावलेल्या व्यक्तिची नोंद किंवा तांत्रीक अडचणीमुळे नोंदणी ही उशीरा झाली असावी. मयत भागवत सावळे यांना यावलहुन जळगाव पाठवितांनाच त्यांना तसा दाखला देण्यात आला असेलच असे त्यांनी सांगीतले. या सर्व गोंधळामुळे कोरोनामुळे मरण पावलेल्या मजूर व्यक्तीच्या कुटुंबास शासकीय मदतीपासुन वंचीत राहावे लागणार की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Exit mobile version