प्रशासनाचे दुर्लक्ष : नगरसेवक मराठे यांनी केली स्वखर्चाने धुरळणी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढत असल्याने वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही धुरळणी न केल्याने प्रभाग क्र. १३ चे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी स्वखर्चाने प्रभागात धुरळणीस प्रारंभ केला आहे.  त्यांच्या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

शहरात डेंग्यू या आजाराचे रुग्ण आढळून येत आहे. यातच मागील महिन्यात  प्रभाग क्र. १३ मध्ये डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहे.  डेंग्यूच्या डासांचा उपद्रव कमी व्हावा यासाठी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. शहरात धुरळणी करण्यात यासाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेऊन महापालिकेत धुरळणी करून प्रशासनाचा निषेध केला होता. मात्र, त्यांच्या मागणीकडे  प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी  नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी स्वखर्चाने धुरळणी यंत्र विकत घेऊन  प्रभाग क्र. १३ मध्ये  घरोघरी जाऊन धुरळणीस प्रारंभ केला आहे. आजपर्यंत जवळपास ८० टक्के प्रभागात धुरळणी करण्यात आल्याची माहिती नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांनी नगरसेवक श्री. मराठे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2686441851660197

Protected Content