Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रवासी महिलेच्या बॅगेतून सोन्याचा दागिना लांबविला

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव बसस्थानक परिसरात महिला प्रवासीच्या कापडी बॅगमधून ९० हजार रुपये किमतीचा सोन्याचा दागिना चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राजश्री गणेश राजपूत (वय-३७) रा. पाटीलवाडा, चाळीसगाव या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्या कामानिमित्त भडगाव तालुक्यातील वाडे येथे आले होत्या. ३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास सुमारास त्यानंतर चाळीसगाव येथे परत जाण्यासाठी भडगाव बसस्थानक येथे आल्या होत्या. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या कापडी बॅगमधून ९० हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजश्री राजपूत यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोहेकॉ विजय जाधव करीत आहे.

Exit mobile version