Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रभा आयुर्वेद रथयात्रेच्या माध्यमातून आयुर्वेदाची जनजागृती (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |येथे दोन डिसेंबरपासून तर पाच जानेवारीपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात जनमानसांमध्ये आयुर्वेदाविषयी आस्था वाढावी म्हणून प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन जळगाव जिल्हा वैद्यसमूहातर्फे वैद्य प्रता जोशी धुळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आले.

 

महाराष्ट्राची यात्रा करत करत हा रथ १५  डिसेंबर या दिवशी जळगाव येथे पोहोचला. जळगाव येथे ही रथयात्रा काव्यरत्नावली चौक पासून शिवाजी पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. या रथयात्रेच्या आयोजनामध्ये सुरुवातीला लेझीम पथक त्यानंतर शहनाई वादन , वनस्पती दर्शन , आयुर्वेद ग्रंथ पालखी , आयुर्वेद रथ व तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व वैद्य मंडळी यांचा समावेश होता.  जळगाव जिल्ह्यातील ११  वैद्यांचे,  की ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य पणाला लावून आयुर्वेदाची सेवा केली अशांचे सत्कार करण्याचा एक मोठा कार्यक्रम राबविण्यात आला.   यामध्ये यामध्ये वैद्य सी. व्ही. त्रीपाठी,  वैद्य पी. एस. चौधरी,  वैद्य विकास गुळवे,  वैद्य किशोर मोरे,  वैद्य प्रभाकर चौधरी,  वैद्य पी.  जी. पिंगळे,  वैद्य देवेंद्र शर्मा. वैद्य संतलालजी द्विवेदी,  वैद्य उषाताई जगताप , वैद्य उषाताई जळूकर,  वैद्य जगन्नाथ पाटील आदी वैद्यांचा सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचे विद्यापीठातील कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी  आणि हभप दादा महाराज जोशी यांच्या हस्ते तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सत्कार श्री राम मंदिर येथे करण्यात आला. संपूर्ण रथयात्रा ही अत्यंत शिस्तबद्ध रीतीने वैद्य व विद्यार्थी यांनी मिळून पूर्ण मिरवणुकीतून आयुर्वेदाच्या संदर्भातील आरोग्याविषयी माहिती देत व संदेश देत निघाली .

समारोपाच्या वेळी वैद्य वर्गाने जनतेला स्वास्थ राहाण्याविषयी आरोग्याचे माहिती देत मंत व्यक्त केले. यानंतर आयोजित आयुर्वेद मोफत शिबिराचे उद्घाटन करीत सुमारे २६० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अग्निकर्म, विध्द कर्म,  बस्ती मर्मचिकित्सा याविषयीची रुग्णांना माहिती देत व उपचार पद्धती करत मोफत लाभ दिला या पूर्ण रथयात्रेचे आयोजन जळगाव जिल्हा वैद्यसमूह यांचे मार्फत करण्यात आले.

भाग २

Exit mobile version