Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रतिमा अनादर प्रकरणी सेटींगची चर्चा

रावेर प्रतिनिधी | येथील गटशिक्षण विभागातील महापुरूषांच्या प्रतिमेच्या अनादर प्रकरणी कारवाईचे आश्‍वासन देण्यात आले असले तरी यात सेटींग झाल्याची चर्चा असल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

रावेरातील गटशिक्षण विभागातील महापुरुषांचे अनादर प्रकरण जिल्हावर सेटिंग करून मॅनेज केल्याने पूज्य साने गुरुजी आणि मदर टेरसा यांच्या सारख्या महान व्यक्तीचे अवमान प्रकरण न्याया पासुन वंचित राहिल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच झालेली पीआरसीच्या बैठकीत रावेर गटशिक्षणधिकारी यांनी यापुढे असे होणार नाही याची हमी दिल्याचे पंचायत राज समितीचे गट प्रमुख आ अनिल भाईदास पाटील यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना सांगितले. पण रावेरात तालुक्यात या सेटिंग प्रकरणाची जोरदार चर्चा आहे.यामुळे पंचायत राज समितीची देखिल प्रतिमा मलीन होत आहे.रावेरच्या गट शिक्षण विभागात महापुरुषांचा अनादर झाल्याचे वृत्त प्रसिध्द होताच तालुक्यात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणात लक्ष घालुन कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष निळे निशान सामाजिक संघटना तसेच साने गुरुजी यांचे अनुयाई यांच्या कडून करण्यात आली होती. या प्रकरणा वरुन रावेरात पंचायत राज समितीने अधिकार्‍यांना फैलावर घेतले होते.

दरम्यान, जिल्हा परिषधेच्या सिईओच्या उपस्थित जिल्हाच्या बैठकीत आम्ही हे प्रकरण ठेवून कारवाई करणार असल्याचे पंचायत राज समितीचे गट प्रमुख आ अनिल भाईदास पाटील यांनी रावेरात पत्रकारांना सांगितले होते.परंतु तीन दिवसा नंतर जिल्हा परिषदच्या विश्वसनीय सूत्रा कडून समजले कि या प्रकरणात आर्थिक मोठी सेटिंग झाली असून हे घडवुन आणन्याचे काम रावेर तालुक्यातील एका शिक्षकाने केल्याचे वृत्त आहे. रावेर शिक्षण कार्यालयात झालेल्या अनादर प्रकरणात गटशिक्षणाधिकारी यांनी या पुढे असे होणार नाही याची लेखी हमी दिल्याचे पंचायत राज समितीचे गट प्रमुख अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले.त्यामुळे अनादर करून देखिल शिक्षण विभागाला दिलासा मिळाल्याने रावेर तालुक्यात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. यापूर्वी महापुरुषांचे अनादर करणार्‍या अनेक राजकीय पदाधिकारी लोप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.

Exit mobile version