Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रजासत्ताक दिनानिमित्त रेल्वे विभागातर्फे विविध कार्यक्रम

Bhusaval 6

भुसावळ, प्रतिनिधी | येथील रेल्वे क्रीडांगण मैंदानावर ७१ व्या प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी रेल्वे विभागातर्फ साजरा करण्यात येणार आहे. यावेळी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रजासत्ताक दिनानानिमित्त मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन. डी.गांगुर्डे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ध्वजारोहण समारोहानंतर परेड, डॉग शो, सांस्कृतिक अकादमीचे कलाकार देशभक्तीप्र गीत सादर करतील. नागरी सुरक्षा दल तर्फे प्रदर्शन व शाळकरी मुले लोकनृत्य सादर केले जाणार आहेत.

Exit mobile version