Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रकाश आंबेडकरांकडून आठवलेंची कुत्र्या-मांजरांसोबत तुलना

मुंबई प्रतिनिधी । भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची तुलना कुत्र्या-मांजरांशी करून खळबळ उडवून दिली आहे.

अलीकडेच रामदास आठवले यांनी आंबेडकर हे ओवेसींसोबत जातात पण रिपब्लीकन पक्षातील नेत्यांशी बोलत नसल्याबाबत टीका केली होती. यावर आंबेडकरांनी त्यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली आहे. त्यासंदर्भात त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, मी कुत्र्या-मांजरांवरती बोलत नसतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद हे टोकाला गेल्याचे अधोरेखीत झाले आहे.

Exit mobile version