Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पो.नि.रणजित शिरसाठ यांच्याहस्ते गरजू रूग्णांना कंबलचे वाटप

MIDCPolice

जळगाव प्रतिनिधी । अयोध्यानगरातील शिवजयंती समिती आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात गरजू रूग्णांना कंबलचे वाटप करण्यात आले.

जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात गरजू रूग्ण, रूग्णांचे नातेवाईक आणि बाहेर झोपलेले भिकारी यांना अयोध्या नगरातील शिवजयंती समिती आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने कंबलचे वाटप करण्यात आले. कंबलचे वाटप केल्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रदीप अशोक पाटील, मिलिंद अशोक पाटील, भगवान भालेराव, सचिन शिंदे, रियाज पिंजारी, अनिल सोनवणे, ईश्वर ढिवरे, श्रीकांत सोले, विशाल देशमुख यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते यांनी आर्थीक सहकार्य केले. तर गोपनीय विभागाचे पोहेकॉ तुकाराम निंबाळकर, विश्वास बोरसे, ललित गवडे यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version