Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोस्ट ऑफिस कार्यालयासमोरून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।

जळगाव शहरातील पांडे चौकातील पोस्ट ऑफिस कार्यालय समोरून एका महानगरपालिका कर्मचाऱ्यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून येण्याची घटना उघडकिला आली आहे. याबाबत जिल्हापेठ शुक्रवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रमोद पंडित भारंबे (वय 55) रा.आयोध्या नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता ते दुचाकी (एमएच १९ एझेड १९६०)ने जळगाव शहरातील पांडे चौकातील पोस्ट ऑफिस टपाल कार्यालयाजवळ दुचाकीने आले होते. त्यावेळी टपाल कार्यालयासमोर दुचाकी पार्किंगला लावून ते कामानिमित्त निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर त्यांनी दुचाकीच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहे.

Exit mobile version