पोळा सणाच्या दिवशीच बैलाचा शॉक लागून मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी ।  तालुक्यातील तमगव्हान येथे तुटलेल्या महावितरण तारेला बैलाचा धक्का लागल्याने जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. पोळ्याच्या दिवशीच बैलाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील तमगव्हान येथील लक्ष्मण आनंदा सामंत ( वय- ५०) यांनी बैलपोळ्याचा सण असल्याने कामगाराला सकाळी बैलांना धुवून आणायला सांगितले. दरम्यान कामगार बैलांना घेऊन जात असताना गावातच पोलवरील तार तुटलेली होती. तारेला  धक्का लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला ही घटना आज सकाळी ७.३० वाजता घडली.  मात्र बैलपोळ्याच्या दिवशीच बैलाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहेत. तत्पूर्वी या वायरीबद्दल गावकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कळवले होते. परंतु कर्मचाऱ्यांनी बेजबाबदारपणा दाखविल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावाकडे धाव घेऊन पाहणी केली. त्याचबरोबर पंचणामे करणे सुरू होते. दरम्यान पंचणामे झाल्यानंतर नुकसान भरपाई महावितरण कंपनीकडून देण्यात येतील का? याकडे गावाचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content