Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस शिपाई सुद्धा उपनिरीक्षक होणार

 

मुंबई :  वृत्तसंस्था ।  गृहविभाग येत्या अधिवेशनानंतर एक प्रस्ताव घेऊन येणार आहे. यानुसार पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता येणार आहे.

 

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गृहमंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन याबाबतचं ट्विट करण्यात आलं आहे.

 

“पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली”

 

गृहविभागाच्या माहितीनुसार एखादा तरुण पोलीस शिपाई म्हणून भरती झाला, तर निवृत्त होईपर्यंत त्याला एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचता यावं. अर्थात आतापर्यंत संबंधित पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होतात. मात्र आता हे निकष तर असतीलच, पण पोलीस शिपायाला  निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी महाराष्ट्र गृहविभाग प्रस्ताव तयार करत आहे.

 

राज्याचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. कोरोना संकटामुळे केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आहे. यावरुन राजकारण रंगलं आहे. मात्र गृहविभागा अधिवेशनानंतर याबाबत निर्णय घेणार आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती खुद्ध गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

 

या प्रस्तावानुसार जो कोणी पोलिसात भरती होईल, तो निवृत्तीवेळी PSI झाला असेल हे निश्चित. हा प्रस्ताव जर निर्णयात बदलला आणि त्याची अंमलबजावणी झाली तर तो पोलीस दलासाठी मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असेल.

 

Exit mobile version