Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस ठाण्याच्या मागील मोकळ्या जागेतील गवताला आग

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेतील गवताला दुपारी आग लागली.  महापालिकेच्या अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठत या आगीवर नियंत्रण मिळवले.

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस पोलीस वसाहत आहे यापासून काही अंतरावर भारत कंपनीचा  पेट्रोलपंप सुध्दा आहे. या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेतील गवताला बुधवारी पावणेदोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. प्रकार लक्षात आल्यानंतर या परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली. त्यानुसार अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. व आगीवर नियंत्रण मिळवले. जवळच पेट्रोलपंप असल्याने तसेच आग पसरून दुर्घटना घडली असती. मात्र वेळेत अग्निशमन बंब पोहोचल्याने ही घटना टळली. अग्निशमन विभागाचे वाहनचालक देविदास सुरवाडे, रवी बोरसे ,भगवान जाधव यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

Exit mobile version