Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोलीस अधिकाऱ्यांनी विठ्ठल मंदिर वार्डातील कटेन्मेंट झोनची केली पाहणी (व्हिडिओ)

भुसावळ, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात कोरोना पोझेटिव्ह रुग्णांची संख्या ३४३८ इतकी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेला संबोधित केले व महाराष्ट्रात लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याच्या सूचना दिल्या. तसेच लॉकडाउन हा रेड झोन असलेले जिल्हे, तालुके तसेच शहरासाठी राहणार आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनातर्फे विठ्ठल मंदिर वार्डातील कटेन्मेंट झोनची पाहणी केली.

प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांना लॉकडाउन वाढण्यात आल्याबद्दल काही नवीन परिपत्रक जारी करण्यात आले का? अशी विचारणा केली असता असे कोणतेही आदेश आद्यापपर्यंत त्यांना प्राप्त झाले नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भुसावळ तालुक्यातील कामकाज मागील सूचनेप्रमाणे सुरू आहे. नगरपरिषद कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकांदारावर कारवाई करीत आहे.तर पोलीस अधिकारी कंटेन्मेंट झोनची पाहणी करीत असून रस्त्याने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करतांना दिसत आहे. आजरोजी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी केली. यावेळी अखिल भारतीय लेवा पाटीदार समाजाचे शहर अध्यक्ष देवा वाणी, गोपनीय विभागाचे नंदकिशोर सोनवणे, सचिन पोळ उपस्थित होते.

Exit mobile version