Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोटच्या मुलाकडून मायबापाला मारहाण

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलाच्या शेतातील केळीचे झाडे कापून म्हशीला टाकल्याच्या कारणावरून मायबापाला शिवीगाळ केली. तर बापाला लोखंडी आसारीने मारहाण करून दुखापती केली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील कसुंबा येथे वसंत महाजन हे आपल्या पत्नी चंद्रभागा महाजन यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांचा मुलगा महेश वसंत महाजन हा वेगळा पत्नीसह राहतो. बुधवारी २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी वसंत महाजन व त्यांची पत्नी चंद्रभागा महाजन यांच्या शेतातील केळीचे झाडे कापून मुलगा महेश महाजन म्हशीला टाकले. याचा जाब विचारण्यासाठी महेशची आई चंद्रभागा ह्या गेल्या असता या रागातून मुलगा महेश याने शिवीगाळ करून दमबाजी केली तर वसंत महाजन यांच्या पाठीवर लोखंड सळई मारून दुखापत केली. याबाबत चंद्रभागा महाजन यांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मुलगा महेश महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जगदीश पाटील करीत आहे.

Exit mobile version