Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘पॉझिटीव्ह’ महिलेच्या संपर्कात आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील कोरोना पॉझिटीव्ह महिलेच्या संपर्कात असणार्‍या सातही जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

याबाबत वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिलेच्या पतीसह तिच्या संपर्कात आलेल्या सात जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. याच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.जी. चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंगसे येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुंगसेसह परिसरातील गावांमध्ये पूर्णपणे बंद पाळण्यात येत असून येथे फवारणी करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version