Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैसे मागण्याच्या कारणावरून मेडीकल विक्रेत्याला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात असलेल्या मेडिकल विक्रेत्याला पैसे मागण्याच्या कारणावरून एकाने दारूच्या नशेत बेदम मारहाण करून दुखापत करून गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब लक्ष्मण पाटील (वय-४९) रा. दादावाडी जळगाव यांचे गेंदालाल मिल परिसरात रामकृष्ण मेडिकल नावाचे दुकान आहे. सोमवार ८ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० वाजता बाळासाहेब पाटील हे त्यांच्या मेडिकलवर असताना त्याठिकाणी अजिज बाबा पठाण रा जळगाव हा दारूच्या नशेत आला. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी पैसे मागितले, दरम्यान याचा राग आल्याने अजिज पठाण याने चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व झटापटीत बाळासाहेब पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व अंगठी गहाळ झाले.

तसेच त्यांच्या मेडिकल दुकानातील काचा देखील फोडल्या गेल्या. यात अजिज पठाण याने मेडिकल विक्रेत्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात बाळासाहेब पाटील यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात अजिज बाबा पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version