Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैश्यांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ जणांवर गुन्हा

crime-2

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील धोडगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेला पैश्यांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील धोडगाव येथील माहेर असलेल्या शितल गजानन पाटील (वय-२६) रा. रामचंद्र नगर धुळे, ह.मु. धोडगाव ता. चोपडा यांचे धुळे येथील गजानन कैलास पाटील यांच्याशी विवाह झाला. सुरूवातीचे दोन वर्ष चांगले गेले. त्यानंतर लहान सहान गोष्टींवरून मारझोड करण्यास सुरूवात केली. घरात फर्निचर बनविण्यासाठी माहेरहुन पैसे घेवून ये यांसाठी पुन्हा शारिरीक व मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. विवाहिता शितल पाटील यांच्या फिर्यादीवरून पती गजानन कैलास पाटील, सासू सुमनबाई कैलास पाटील, सासरा कैलास रामदास पाटील, दिर शरद कैलास पाटील चौघे रा. धुळे, ननंद छाया सुनिल पाटील, नंदोई सुनिल दंगल पाटील, रा. खेतीया जि. बडवाणी मध्यप्रदेश, ननंद माया ज्ञानेश्वर पाटील, ज्ञानेश्वर दिलीप पाटील दोन्ही रा. फागणे जि.धुळे यांनी देखील पतीला खोटी माहिती देवून शिवीगाळ केली. हा छळ असहाय्य झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जाधव करीत आहे.

Exit mobile version