Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा

mahila

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्यामनगर येथील माहेर असलेल्या २७ वर्षीय विवाहितेचा पैश्यांसाठी मानसिक व शारिरीक छळ करणाऱ्या नाशिक येथील पतीसह सात जणांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील श्यामनगर येथील माहेर असलेल्या विवाहिता कोमल धिरज शिंदे (वय-२७) रा. कामठवाडा नाशिक यांचा विवाह धिरज रंगराव शिंदे यांच्याशी झालेला आहे. १८ जानेवारी २०२० पासून विवाहिता सासरी असतांना हुंड्याच्या पैश्यांसाठी पती धिरज शिंदे यांनी शिवीगाळ, मारहाण व मानसिक अत्याचार केला. याला पाठबळ देणारे रंगराव पंडितराव शिंदे, सासु सुगंधा रंगराव शिंदे, ननंद संध्या लक्ष्मीकांत बोरसे, नंदोई लक्ष्मीकांत बन्सीलाल बोरसे, नंनद शितल गणेश वाघ, गणेश विलासराव वाघ रा. कामठवाड नाशिक यांनी देखील हुंड्यासाठी टोमणे मारणे सुरू केले. हा अत्याचार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे. 

Exit mobile version