Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्लॉट घेण्यासाठी माहेरहून ५ लाख ८० हजार रूपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा येथील माहेर असलेल्या परविनबी मोहम्मद जफर उर्फ राजू (वय-३०) यांचा विवाह धरणगाव येथील मोहम्मद जफर अब्दुल मुनाफ यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती मोहम्मद जफर अब्दुल मुनाफ याने विवाहितेला माहेरहून ५ लाख ८० हजार रुपये प्लॉट घेण्यासाठी आणावे अशी मागणी केली. परंतु माहेरच्यांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विवाहितेने पैसे आणले नाही. या कारणावरून पती मोहम्मद जाफर अब्दुल यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासरे, सासु, जेठ, जेठाणी यांनी देखील पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता चोपडा येथे माहेरी निघून आल्या. १७ मे रेाजी विवाहितेने चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती मोहम्मद जफर अब्दुल मुनाफ, सासरे अब्दुल मुनाफ शेख रऊफ मुनाफ, सासु शकीलाबी शेख अब्दुल मुनाफ, जेठ शेख अशरफ अब्दुल मुनाफ आणि जेठाणी निलोफर उर्फ गुड्डी शेख अरशद मुनाफ सर्व रा. भडंगपुरा धरणगाव यांच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप भोई करीत आहे.

Exit mobile version