Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पेसा क्षेत्रातील नागरीकांना दाखले देण्यात यावे : ग्रामसेवक संघटनेची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  प्रतिनिधी | येथील जिल्हा एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालयाच्या माध्यमातुन अनुसूचित क्षेत्र पेसा अंतर्गत रहिवासी नागरीकांना शासन निर्णया अनुसार प्रमाणपत्र व दाखले देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आदीवासी प्रकल्प अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

 

या संदर्भात यावल तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी , सचिव पुरुषोत्तम तळेले, ग्रामसेवक पतपेटीचे व्हाईस चेअरमन बि. के. पारधी, सदस्य हितु महाजन व ग्रामसेवक संघटनेचे सदस्य परसाडे गावाचे ग्रामसेवक मजीत तडवी , मालोद चे ग्रामसेवक राजु तडवी व आदीनी जिल्हा एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प चे प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे , यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की , संदर्भीय उपरोक्त राज्य ग्रामविकास विभागाच्या पत्र क्रमांक१ अनुसार पेसा अंतर्गत येणार्‍या क्षेत्रात राहणार्‍या अनुसुचित जमाती नागरीकांना रहीवासी दाखले देणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असुन, लाभार्थी यांचे स्वयंघोषणा पत्र स्विकारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भानुसार ग्राम पंचायत मार्फत वितरीत करण्यात येणार्‍या दाखल्यामध्ये रहीवासी दाखला देणे बाबत कुठही उल्लेख केलेला नाही . त्यामुळे उपरोक्त विषय क्रमांक१ आणी २ अनुसार पेसा क्षेत्रा अंतर्गत रहिवासी नागरीकांना रहिवासी दाखला देण्यातचा ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना नाही तरी ग्रामसेवक आणी ग्रामविकास अधिकारी यांच्या कड्डन दाखले मागण्यात येवु नये.

 

दरम्यान,  शासना निर्णय क्रमांक३नुसार सरळ सेवेच्या पद भरती करीता अर्ज करणार्‍या अनुसुचित जमातीच्या उमेदवारांना पेसाअंतर्गत राहणार्‍या नागरीकांना आपल्या एकात्मीक आदीवासी प्रकल्प विकास कार्यालया मार्फत रहिवासी दाखले देण्यात यावे असे शासनाने आदेशाव्दारे नमुद आहे. तरी शासनाच्या आदेशान्वये विहीत मुदतीत आपल्याकडुन रहिवासी दाखले उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी ग्रामसेवक संघटना यावल तालुका जिल्हा जळगाव यांच्या नेतृत्वात प्रकल्प कार्यालय यावल प्रकल्प अधिकारी यांचे प्रतिनिधी सहायक प्रकल्प विस्तार अधिकारी पवन पाटील व गटविकास अधिकारी डॉ मंजुश्री गायकवाड यांना  ग्रामसेवक संघटना अध्यक्ष रुबाब तडवी व जिल्हा ग्रामसेवक पतपेठीचे व्हाईस चेअरमन बी. के.  पारधी यांच्यासह आदी पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

Exit mobile version