Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पेरणीची घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

 

नागपूर: वृत्तसंस्था । यंदा राज्यात मान्सूनचा हंगाम दणक्यात सुरु झाला असली तरी शेतकऱ्यांनी इतक्यात पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.

 

आगामी काही दिवसांमध्ये राज्यात अतिवृष्टीची  शक्यता आहे. त्यामुळे घाईघाईने बियाणे पेरल्यास ते वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी काही काळ धीर धरावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

 

राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी तयारी सुरु केली होती. मात्र, हवामान खात्याने नागपुरात  जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तोपर्यंत बियाणांची पेरणी करु नये, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

 

 

हवामान खात्याने मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या चार-पाच दिवसांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तविला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा  पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत किनारपट्टीलगत असणाऱ्या भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्गात ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Exit mobile version