Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसतर्फे निवेदन

यावल, प्रतिनिधी । देश कोरोनाविषाणूच्या संकटात सापडला असून नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. अशावेळी केंद्र शासनाकडून वारंवार पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवण्याचा सपाटा लावला असून यामुळे प्रचंड नाराजी पसरलीआहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवार ३ जुलै रोज तहसिलदार जितेन्‍द्र कुवर निवेदन देण्यात आले.

संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीने त्रस्त आहे. या संकटाने लाखो लोकाचे रोजगार हिरावले गेले आहेत. उद्दोग धंदे अजून देखील पूर्वपदावर आलेलं नाही बहुसंख्य जनता जगण्यासाठी धडपड करित आहे अश्या कठीण प्रसंगी पेट्रोल डिझेलच्या महागाईने आणखी एक संकट लोकांवर ओढावले आहे. देशभरात पेट्रोलच्या किंमतीपेक्षा डिझेल चे दर वाढत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर निचयांकीच्या पातळीवर असताना त्यांचा थेट फायदा सामान्य जनतेला दिला जात नाही. . परंतु, केंद्र सरकार हे सर्व सामान्य जनतेला वेठीला धरून पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून वसुली करण्यात येत आहे. जिल्हा परिषदचे गटनेते तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे त्यांच्या प्रमुख उपस्थितित सतीश पाटील काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान , अनु जाती विभाग काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, राष्ट्रवादी’च्या द्वारका पाटील अमोल भिरूड, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष रेहमान खाटीक, पुंडलिक बारी, हाजी गफ्फार शहा, अनिल जंजाळे, मनोहर सोनवणे, समीर मोमिन नईम शेख, मेंबर बशीर तडवी आदि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तहसीलदार जितेंद्र कुवर त्यांना निवेदन देण्यात आले

Exit mobile version