Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पूणगावात तरुणीची आत्महत्या

 

चोपडा : प्रतिनिधी । तालुक्यातील पुनगाव येथील २० वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

चोपडा पुनगाव येथील २० वर्षीय कोमल अरुण बाविस्कर या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप पाटील यांनी तिची तपासणी केली असता तिला मयत घोषित केले. दुपारी उशिरापर्यंत जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अस्कमात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास सुनिल सोनार हे करीत आहे.

 

Exit mobile version