Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुस्तकाचा खपासाठी मारियांनी खोटा दावा केलाय : छोटा शकील

chota shakil

 

मुंबई (वृत्तसंस्था) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला मारण्याची सुपारी घेतली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी केला होता. त्यावर पुस्तकाचा खप व्हावा म्हणून कसाबला मारण्याची सुपारी दाऊदला दिल्याचा दावा दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा शकीलने फेटाळून लावला आहे.

 

कसाबला मारण्याची सुपारी दाऊदला मिळाली नव्हती. मारिया यांनी चुकीचा दावा केला आहे, असे छोटा शकीलने म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना छोटा शकील यांनी ही गोष्ट सांगितली आहे. कसाबला मारण्याची सुपारी दाऊदला मिळाली होती. ही बकवास आहे. पुस्तकाचा खप व्हावा म्हणून हा दावा करण्यात आला आहे. कसाब किंवा अन्य कोणालाही मारण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच भारतात कोण खोटं बोलत नाही, सर्वच खोटं बोलत आहेत, असेही छोटा शकीलने म्हटले आहे. दरम्यान, सरकारी वकील उज्जव निकम यांनीही मारिया यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version