Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

.पुरावे द्या अन्यथा सरकारची माफी मागा – महेश तपासे

 

मुंबई : वृत्तसंस्था । फडणवीसांनी कायमस्वरूपी घरी बसवलेल्या बावनकुळे यांनी फडणवीसांची मर्जी राखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारवर बेताल वक्तव्य केले आहे परंतु बावनकुळे यांनी याबाबतचे पुरावे द्यावे अन्यथा सरकारची जाहीर माफी मागावी असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

माजी मंत्री बावनकुळे यांनी सरकारमध्ये सर्वप्रकारचे अवैध धंदे सुरू आहे. त्यासाठी जिल्हे वाटून घेतल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी उत्तर दिले आहे.

सत्ता गेल्यानंतर आणि स्वतःला व पत्नीला तिकीट न मिळाल्यामुळे मानसिक संतुलन गमावलेल्या अवस्थेत बावनकुळे असावे? म्हणून ते अशी वक्तव्य करत असल्याचे महेश तपासे म्हणाले.

Exit mobile version