Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुराच्या पाण्यात वाहून गेली एसटी !

यवतमाळ | पुरामुळे नाल्याच्या पुलावरून पाणी वाहन असतांनाही एसटी चालकाने तेथून जाण्याचे केलेले धाडस अंगलट आले असून ही बस वाहून गेल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे.

 

यवतामळमधील उमरखेड येथील दहागाव जवळ पुराच्या पाण्यात एसटी बस वाहून गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या बसमध्ये सहा ते सात प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. सकाळी साडे आठच्या सुमारास उमरखेडवरुन ही एसटी बस पुसद येथे जात असताना ही घटना घडली आहे. रात्री मुसळधार पावसामुळे दहागाव येथील नालाच्या पुलावरून पाणी वाहत होते. याच नाल्यावरून एसटीचालकाने ही बस नेल्याने ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे.

 

स्थानिकांना दोन प्रवाशाला वाचवण्यात यश आले आहे तर एका प्रवाशाचा मृत्य झाला आहे. इतर प्रवाशांच्या बचावासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या घटनेनंतर तहसीलदार आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुराच्या पाण्यातून वाहने घेऊन न जाण्याचे आवाहन करण्यात आले असतानाही एसटी चालकाने अतिधाडस दाखवत बस पाण्यात नेली. मात्र नाल्यावरून वाहणार्‍या पाण्याचा वेग जास्त असल्याने बस पाण्यासोबत वाहून गेली आहे.

Exit mobile version