Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुनगावात माकडाची अंतयात्रा : गावाने पाळले सुतक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पुनगाव येथे माकडाची अंत्ययात्रा काढण्यात आली.

 

गिरणानदीच्या किनार्‍यावरील पुनगाव येथे एका आजारी माकडावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवत माकडाला गंभीर जखमी केले होते. त्यात त्या माकडाचा मृत्यू झाला. पूर्ण गावाने एकत्र येत मयत माकडाचे बँड लावून अंत्यसंस्कार केले. इतकेच नाही तर दशक्रिया विधीसाठी संपूर्ण गावाने एकत्र येत भोजन दिले व १२० गावकर्‍यांनी मुंडण करून सुतक पाळले.

 

पुनगाव येथे दि. ९ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास एका आजारी माकडावर गावातील कुत्र्यांनी हल्ला चढवत माकडाला गंभीर जखमी केले होते. गावातील तरुणांनी त्या माकडाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच माकडाची प्राणज्योत मालवली असता तेथूनच माघारी माकडाला गावात आणुन त्याची अंघोळ घालून नवीन कपडे घातले. फुलहार घालून तसेच बँन्ड लावून अंत यात्रा काढून विधीवत अंतिम संस्कार करण्यात आले.

 

यावेळी गावातील पोलीस पाटील प्रविण ठाकुर, चिंतामण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक आमले, दादाभाऊ सोनवणे, रविंद्र गुजर, सिताराम कोळी, अशोक परदेशी, आबा कोळी, अशिष चव्हाण, रमेश ठाकरे, हंसराज गुजर व गावकरी उपस्थित होते.

 

यावेळी अनेक भाविक महिला व पुरुष यांनी माकडाला टोपी रुमाल देऊन नमस्कार केला काहिंना या वेळी आपले अश्रू अनावर झाले होते. यानंतर उपस्थित गावकर्‍यांनी ज्या ठिकाणी माकडाला दफन केले त्याठिकाणी ओटा बांधकाम करुन वानर देवाची स्थापना करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे करण्याची तयारी दाखवली. या मृत माकडाप्रती गावकर्‍यांनी दाखवलेल्या माणुसकीची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

 

 

पुनगांव येथील मृत माकडाचे दशक्रिया उत्तर कार्य पाच दिवसात करण्यात आले या वेळी गावातील जवळपास १२० लोकांनी दशक्रिया विधीत मुंडन (बाल दिले) केले व संपूर्ण गावातील लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानिमित्ताने गावकर्‍यांना उत्तर कार्य निमित्ताने भोजन व्यवस्था करण्यात आली होती.

Exit mobile version