Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुतीन “रशियामधील ‘सर्वात देखणा पुरुष’

 

 

 

मास्को : वृत्तसंस्था । रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देशातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळेच रशियातील सर्वात देखणा पुरुष अशी नवी ओळख पुतीन यांना मिळाली आहे.

 

 

हजारो  लोकांचा  समावेश असणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये ६८ वर्षीय अविवाहित पुतीन हे सर्वात सुंदर पुरुष ठरलेत. सुपरजॉब डॉय आरयू नावाच्या वेबसाईट रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी पुतीन यांच्या नावाची निवड केल्याचं पहायला मिळालं. सर्वेक्षणातील १८ टक्के पुरुषांनी तर १७ टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. रशियन जनतेच्या मनात आजही पुतीन हेच देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचं चित्र या सर्वेक्षणातून दिसून आल्याचं वेबसाईटने सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.

 

या सर्वेक्षणामध्ये पुतीन यांच्या लोकप्रियतेसमोर सर्वच रशियन कलाकार, नेते आणि खेळाडून फिके पडल्याचं पहायला मिळालं. मासे पकडताना, घोड्यावर स्वार झालेले पुतीन यांचे अनेक फोटो वेळोवेळी समोर आलेत. या फोटोंमध्ये पुतीन हे शर्टलेसच दिसून येतात. एका मुलाखतीमध्ये पुतीन यांनी आपल्याला या शर्टलेस फोटोंबद्दल लज्जास्पद असं काही वाटतं नाही, असं म्हटलं होतं. या फोटोंमध्ये पुतीन यांना एक शक्तीशाली व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला.

 

२२ मार्च ते एक एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येकाला एका प्रश्नांची यादी देण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १९ टक्के पुरुषांनी स्वत:लाच रशियामधील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं मत दिलं होतं. तर १८ टक्के महिलांनी रशियामध्ये सुंदर पुरुषच नाहीयत असं मत दिलं होतं.

 

रशियातील सर्वात देखण्या पुरुषांच्या यादीत पुतीन यांच्यानंतर अभिनेता दिमित्री नागियेव यांचा समावेश आहे. त्यानंतर डॅनिला कोजलोव्स्की आणि कॉन्साटंटिन खाबेन्सिकी यांचा क्रमांक असून या सर्वांमध्ये दोन ते तीन टक्के मतांचा फरक दिसून येतोय. रशियामधील ३०० शहरांमधून हजार पुरुष आणि दोन हजार महिलांनी या सर्वेक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवला. पुतीन यांनाच या सर्वेक्षणामध्ये १० टक्क्यांहून अधिक मतं मिळाल्याचा दावा वेबसाईटने केलाय.

 

रशियन संसदेमधील वरिष्ठ सभागृहाने नुकताच पुतीन यांना  दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होण्यासंदर्भात संधी देण्याचा कायदा संमत केला. त्यामुळे पुतीन हेच २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत. पुतीन यांची लोकप्रियता सर्व सामान्यांमध्ये आजही कायम असल्याचं या सर्वेक्षणामधून पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Exit mobile version