Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्याला निघालेला तरूण चाळीसगावातून बेपत्ता

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । पुण्याहून नातलगांच्या लग्नासाठी चाळीसगावात आलेला  २४ वर्षीय तरूण शहरातील रेल्वे स्थानक येथून बेपत्ता झाला  याप्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

 

नितीन दगा पाटील हा पुणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे.  नातलगांच्या घरी लग्न असल्याने नितीन २ ऑगस्टरोजी सायंकाळी चाळीसगाव येथे आलेला होता. लग्न आटोपल्यानंतर नितीन पाटील पुण्याला जाण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्थानकाकडे जात असताना त्याचा मावसभाऊ बंटी पाटील ( रा. शिरसमणी ता. पारोळा ) त्याला रस्त्यात भेटला.  त्याने नितीनला रेल्वे स्थानकाजवळ नेऊन सोडलं. नंतर नातेवाईकांनी ३ ऑगस्टरोजी सकाळी नितीनला फोन केला  मात्र त्याचा मोबाईल बंद येत असल्याने पुणे येथील त्याच्या मित्राला फोन करण्यात आला नितीन पुणे येथे आलाच नसल्याचे मित्रांकडून सांगण्यात आले. नातेवाईकांनी शोध घेतला मात्र त्यांना त्याचा ठावठिकाणा लागला नाही त्यानंतर    सागर पाटील ( रा. देवळी )  यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली  पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

 

Exit mobile version