Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात युवा सेना नेत्याची हत्या

पुणे: वृत्तसंस्था । पुण्यातील युवा सेनेचा पदाधिकारी दीपक मारटकर (वय ३६) यांची हत्या राजकीय वादातून झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मारटकर यांची मध्यरात्री पाच ते सहा जणांनी हत्या केली होती.

दीपक मारटकर हे रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडले होते. मध्यरात्री साधारण एकच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. जखमी मारटकर यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तासाभरानंतर त्यांचा मृत्यू झाला. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची भेट घेतली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

मारटकर जेवण झाल्यानंतर घराबाहेर पडले होते. पाच ते सहा जण दबा धरून बसले होते. मारटकर येताच त्यांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर सपासप वार केले. मारटकर यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ते धावत सुटले. मात्र, हल्लेखोरांनी त्यांना पकडले आणि पुन्हा वार केले. हल्लेखोरांच्या तोंडावर मास्क होते. ते ज्या दुचाकीवरून आले होते, त्या दुचाकींना नंबर प्लेटही नव्हती,

गंभीर जखमी मारटकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. फरासखाना पोलिसांत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय होता. तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version