Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्याचा मृत्यू

1

 

पुणे (वृत्तसंस्था) पेस्ट कंट्रोलनंतर काळजी न घेतल्यामुळे पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.

 

मंगळवारी सायंकाळच्या सूमारास बिबवेवाडी येथील गणेश विहारमध्ये ही घटना घडली आहे. अविनाश सदाशिव मजली (वय64) आणि अपर्णा अविनाश मजली (वय 54) (दोघेही रा. गणेश विहार ए विंग, बिबवेवाडी) अशी मृतांची नावे आहेत. घरात पेस्ट कंट्रोल करून घेतल्यानंतर मजली दांपत्य नातेवाईकांकडे गेले होते. संध्याकाळी सातच्या दरम्यान ते घरात परत आले. घरात आल्यानंतर टीव्ही पाहत असतांना दोघांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. थोड्याच वेळात मजली दाम्पत्य बेशुद्ध पडले. साधारण साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी घरी आल्यानंतर सर्व प्रकार आल. दोघांना तातडीने हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केल. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version