Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या !

पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला. विशेष म्हणजे मुलावर केईएममध्येच उपचार सुरु असतानाच आईने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन एका 36 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. तिच्या 13 वर्षीय मुलावर केईएम रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. मयत महिला पुण्यातील वानवडी भागात राहत होती. दरम्यान, गेल्या काही दिवसात पुण्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. अवघ्या तीन दिवसामध्ये दहा जणांनी आत्महत्या केली आहे

Exit mobile version