Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

पुणे (वृत्तसंस्थ) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.

 

थोडासा ताप आल्याने मी माझी कोरोनाची टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील, असे ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली असून यातील चारही नगरसेवक कोरोना मुक्त झाले आहेत.

Exit mobile version