Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हारसेना , कर्मचारी संघटना व अहिल्या महिला संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.

कोरोनाच्या संकटकाळात लाॅकडाऊनच्या नियमांचे तंतोतंत पालन करत शहरासह जिल्हातील घराघरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २२५ वी पुण्यतिथीनिमित्ताने समाजबांधवांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले. जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हासेना , कर्मचारी संघटना , अहिल्या महिला संघाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. धनगर समाज बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ उखा बोरसे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक , आर्थिक , धार्मिक , राजकीय कार्याच्या संदर्भातील आॅडिअो क्लिप गुरु थिअटरचे संचालक धनंजय धनगर व प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर यांच्या मार्फत सर्व पदाधिकार्‍यांना आॅनलाईन ऐकविण्यात आली. याप्रसंगी धनगर बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ बोरसे,प्रदेश महामंत्री सुभाष सोनवणे , सचिव प्रभाकर न्हाळदे,संचालक तथा प्रदेश उपाध्यक्ष संतोष धनगर, मल्हारसेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप तेले,धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलिप धनगर , जिल्हासरचिटणिस गणेश बागुल, मल्हारसेनेचे अध्यक्ष डाॅ.संजय पाटील , जिल्हासरचिटणिस महेंद्र सोनवणे, शहराध्यक्ष प्रविण पवार, मयुर ठाकरे , धिरज धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version