Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती साजरी

जळगाव, प्रतिनिधी | कोरोनाच्या संकटकाळात लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करत शहरासह जिल्हातील घराघरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती समाजबांधवांकडून साजरी करण्यात आली.

जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणित मल्हासेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोजक्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. धनगर समाज बोर्डिंगचे अध्यक्ष नानाभाऊ उखा बोरसे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले. याप्रसंगी सचिव प्रभाकर न्हाळदे, संचालक संतोष धनगर, प्रदेश उपाध्यक्ष संदिप तेले, उ.महाराष्ट्र्‍ विभाग प्रमुख सुभाष करे, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलिप धनगर, जिल्हासरचिटणिस गणेश बागुल, महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष विष्णुआप्पा ठाकरे, मल्हारसेनेचे जिल्हासरचिटणिस महेंद्र सोनवणे, शहराध्यक्ष प्रविण पवार, दै.सकाळचे पत्रकार गजानन पाचपोळ, संदिप पाचपोळ, मयुर ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version