Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर विचित्र अपघात, अकरा वाहने एकमेकांवर आदळली

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिटजवळ आज झालेल्या विचित्र अपघातात एकूण अकरा वाहने एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे.  सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

अधिक माहिती अशी की, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिटजवळ विचित्र अपघात झाल्याचे पहायला मिळाले. यात अक्षरशा: एकुण ११ वाहने एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसार झाले आहे. यात कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी अनेकजण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाल्याने घटनास्थळी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात ११ वाहनांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावर अपघात वाढत आहेत.

Exit mobile version