Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुणे : भोंदू बाबाकडून पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार !

 

black magic

 

पिंपरी (वृत्तसंस्था) घरात असलेले गुप्तधन काढून देणे आणि पुत्रप्राप्तीच्या बहाण्याने भोंदू बाबाने एकाच कुटुंबातील पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे.

 

भोंदूबाबा सोमनाथ याने पीडित महिलेच्या कुटुंबियांना सांगितले की, घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तसेच नात्यातील एका बाईने घरातील प्रत्येक सदस्यावर करणी केली आहे. त्यामुळे तुमच्या घरात पुत्रप्राप्ती होत नाहीय. एवढेच नव्हे तर, तुमच्या घराच्या एका खोलीत सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मूर्ती असे गुप्तधन आहे. यासाठी घरात तीन उतारे व नग्नपूजा करावी लागेल, असा उपाय भोंदूबाबाने सांगितला. त्यानंतर पीडित महिलेसह तिच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने एका खोलीत नेले. खोलीचे दार बंद करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सर्व बहिणींना बाहेर जाताना झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ‘तुझ्या आई-वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारून टाकीन’ अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेच्या एका बहिणीसोबत उतारा काढण्याच्या बहाण्याने तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. तसेच पीडितेच्या एका बहिणीचे लग्न झालेले असताना देखील तिच्याशी पुन्हा लग्न केले. यानंतर पिडीतेने पीडितेने पिंपरी पोलिस धाव घेत गुन्हा दाखल केला.

Exit mobile version