Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पी. जी. महाविद्यालयात रक्त तपासणी शिबीर संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  के. सी. ईच्या पी. जी. महाविद्यालयात,महालॅब जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने  रक्त तपासणी शिबिर नुकतेच पार पडले.

 

रक्तदान शिबीराचे आयोजन गुणवत्ता हमी सेल यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आय.क्यू.ए. सी. समन्वयक प्रा. संदीप पाटील, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. आर. एम. पाटील उपस्थित होते. रक्त पासणी शिबिरात मधुमेहासाठी उपयुक्त असणारी रक्तातील साखर, संपूर्ण रक्त गणाना ( सी.बी.सी. काऊंट ) ही आपल्या संपूर्ण आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच ॲनिमिया ल्युकेमिया  सारख्या अनेक प्रकारचे विकार ओळखण्यासाठी  वापरल्या जाणाऱ्या उपयुक्त चाचण्या करण्यात आल्या.  शिबिरासाठी महालॅब जळगाव येथील भावना पाटील, संदीप सुरवाडे यांनी रक्त तपासणी चाचण्यांसाठी योगदान केले. महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील कल्पेश पाटील, महेंद्र नाईक, प्रांजल सुरवाडे, अंकुर कापसे, अक्षय पाटील रेहान पटेल या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून शिबिरास मदत केली. या शिबिराचा महाविद्यालय परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. विविध विभागातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Exit mobile version