Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीपल्स बँकेसमोरून एकाची दुचाकी लांबविली

two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । जळगाव औरंगाबाद रस्त्यावरील त्रिमुर्ती हॉटेलजवळील पिपल्स बँकेसमोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, विनोद रविंद्र बेडीसकर (वय-२६) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हे खासगी नोकरी करून उदरनिर्वाह करतात. ६ मे रोजी सकाळी १० वाजता ते कामाच्या निमित्ताने जळगाव औरंगाबाद रोडवील हॉटेल त्रिमुर्ती जवळील जळगाव पीपल्स बँकेसमोर लावलेली दुचाकी ( क्रमांक एमएच १९ सीसी ५५७३)  पार्कींगला लावली. रात्री १० वाजता ते दुचाकीजवळ आले असता त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. परिसरात शोधाशोध करून दुचाकी न मिळल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेतली. विनोद बेडीसकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे. 

Exit mobile version