Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीजे रेल्वे पूर्ववत करण्याबाबत कृती समिती आंदोलन छेडणार

*पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | पाचोरा ते जामनेर दरम्यान येणाऱ्या पीजे रेल्वे पूर्ववत करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पीजे रेल्वे बचाव कृती समितीने दिला आहे.

पीजे रेल्वे सुरु करण्यासाठी कृती समितीच्या पदाधिकार्यांनी १ फेब्रुवारी रोजी थेट दिल्ली गाठून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन दिड तास चर्चा केली. यावेळी पीजे रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेचा सुमारे २४ कोटी रुपयांचे खर्च लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी चुकिची माहिती दिल्याचे निष्पन्न झाले आहे. ती पाचोरा ते जामनेर पर्यंत विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव झालेला नसल्याचे कळाल्याचे कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख यांनी येथील हुतात्मा स्मारकात पत्रकार परिषदेचे आयोजन करुन माहिती दिली. यावेळी समितीचे सदस्य अँड. अविनाश भालेराव, अँड. अभय पाटील, अँड. अण्णा भोईटे, सेवानिवृत्त वाणिज्य प्रमुख आर. पी. बागुल, विलास जोशी, प्रा. मनिष बाविस्कर, रणजित पाटील, पप्पू राजपूत, प्रताप पाटील उपस्थित होते. यावेळी सदस्यांनी माहिती देताना सांगितले की, पीजे रेल्वे पुर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार उन्मेष पाटील यांची सकारात्मक भुमिका असून त्यांनी त्याचवेळी रेल्वेच्या भुसावळ व दिल्ली येथील अधिकाऱ्यांना खडसावून तातडीने कारवाई करण्याच्या सुचना दिल्याचे सांगितले. कृती समिती यावरच विसंबून न राहता येत्या काही दिवसांत पाचोरा ते जामनेर दरम्यान येणाऱ्या पीजे रेल्वे प्रवाशी यांचेही हितगुज करुन कोरोना व्हायरसचे वातावरण पाहून भव्य मोर्चा काढला जाणार आहे व यानंतर रेलरोको करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version