पीक पाहणीच्या मुदतीत वाढ

अमळनेर प्रतिनिधी ।   शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पिक पाहणी करण्याच्या मुदतीत राज्य स्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत पिक पाहणीची मुदत  १५ सप्टेंबर होती ती आता वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली आहे.

 

 

राज्य स्तरीय अंमलबजावणी समितीच्या बैठकीत खरीप हंगाम ची पिक पाहणी शेतकरी यांनी करण्यासाठी ची १५ सप्टेंबर ही मुदत ३० सप्टेंबर पर्यत वाढविण्यास मान्यता दिली आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरपर्यंत तलाठी स्तरावरून  पीक पाहणी करण्यास देखील मान्यता दिली असल्याचे ई पीक पाहणी प्रकल्प राज्य समन्वयक   रामदास जगताप यांनी कळविले आहे. तरी अमळनेर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ईपिक पाणी करायची बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर करावी यासाठी शासनाने 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे असे आवाहन तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी केले आहे.

Protected Content