Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीकांच्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात रावेर तालुक्यात वादळी वाऱ्‍यामुळे झालेले नुकसानाची भरपाई मिळावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना निवदेन देऊन तत्काळ भरपाई देण्याची मागणी भाजपाच्या पदाधिकाऱ्‍यांनी मुंबईत जावुन केली आहे.

अधिक माहिती अशी की, ३१ मे, २०२२ रोजी वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले होते. शासनस्तरावर पंचनामे होऊन देखील अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. रावेर तालुक्यातील खानापूर मंडळ व अहिरवाडी कर्जत, केऱ्हाळा बु., केऱ्हाळा खु., पिंपरी, मोहगण, मंगरुळ, जुनोना, अभोडा, निरुड पाडले, खानापूर, अजनाळ आटवडे, नेहते,वाघोड, भोकरी इत्यादी.येथील वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळणे बाबत मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर रावेर तालुक्यातील धनगर समाजाचे नेते तथा भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य संदीप सावळे भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांच्या स्वाक्षऱ्‍या आहेत.

दरम्यान रावेर ग्रामीण रुग्णालयात कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी व उपजिल्हारुग्णालय मंजूरीसाठी मंत्री गिरीष महाजन यांनी मंजूरी देल्याची माहिती भाजपा अध्यक्ष लासुरकर यांनी दिली आहे.

Exit mobile version