Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये 9 ऑगस्टला जारी होणार

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेच्या नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग करतील. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हा 9 वा हप्ता असेल.

 

यावेळी सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20,000 कोटी रुपये पाठवले जातील.  केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 ऑगस्टला नरेंद्र मोदी 12.30 वाजता दोन हजार रुपये वर्ग करतील, अशी माहिती दिलीय.

 

नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये”पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12:30 वाजता शेतकऱ्यांशी संवाद साधतील. या संवादानंतर ते पीएम किसान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील असे म्हटले आहे .

 

आजपर्यंत खात्यात पैसे आले नसतील, तर त्याची स्थिती जाणून घेता येते  पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर भेट  देऊन  आधार, मोबाईल आणि बँक खाते क्रमांक टाकून पैसे येण्याची स्थिती जाणून घेता येते .

 

पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास पात्र शेतकऱ्यांसाठी नोंदणी सुरू आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर pmkisan.gov.in अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज नाही.

 

मोदी सरकारची ही  योजना  2019 च्या लोकसभा निवडणुकीत  गेमचेंजर ठरली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांच्या खात्यात 8 हप्त्यांमध्ये पीएम किसान योजनेची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

 

Exit mobile version