Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पितृदिनानिमित्त पिंप्राळा स्मशानभूमीत वृक्षारोपण

जळगाव, प्रतिनिधी ।  वृक्षारोपणातून पितृऋण व्यक्त करणे म्हणजे पंचतत्त्वांचे पूजन   असे प्रतिपादन पत्रकार दिपक महाले यांनी केले. पितृदिनानिमित्त निसर्ग पर्यावरण व सामाजिक प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी पिताश्री सुपडू सुतार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी म्हणून महाले बोलत होते.

 

वृक्षारोपणाचा कार्यक्रम पितृदिनाच्या औचित्याने पिंप्राळा येथील स्मशानभूमीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी कोचींग क्लासेस असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष पंकज नाले आणि मान्यवर उपस्थित होते. स्मशानभूमी परिसरात आवळा, सिताफळ,पत्थरतोड यांसह इतर औषधी वनस्पतींचे रोपण पंकज नाले,विजय लुल्हे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे मार्गदर्शक प्रकाशक युवराज माळी, महिला पर्यावरण सखी मंच महाराष्ट्र जळगाव जिल्हा उपाध्यक्षा छाया पवार, शहराध्यक्षा नेहा जगताप,उपाध्यक्षा जयश्री देशमुख ,ग्रामीण अध्यक्षा मंजुषा शिरसाठ,पत्रकार किशोर शिंपी, मानवसेवा विद्यालयाचे कलाशिक्षक सुनील दाभाडे, बाळकृष्ण मिस्तरी, संजय वाघ यांचे सहकार्य मिळाले.

Exit mobile version