Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिडीतांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देवू : सुभाष पारधी

 

 

जळगाव, प्रतिनिधी  । जिल्ह्यात दोन ठिकाणी यूवतींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय अनूसुचीत आयेागाचा सदस्य झाल्यानंतर लागलीच हा दौरा केला आहे. त्या यूवतींच्या कुटूंबियांची भेट घेवून त्यांना धीर देत न्याय मिळवून देण्यात येईल आश्‍वासन आज राष्ट्रीय अनूसूचीत आयोगाचे सदस्य सुभाष पारधी दिले आहे. ते अजिंठा विश्रामगृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. 

आज  या पिडीताना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरणही करण्यात आले.   बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, अनूसुचीत आयोग कार्यालयाच्या सहाययक निदेशक आनुराधा दुसाने , समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील आदि उपस्थित होते.

सुभाष पारधी  यांनी पुढे सांगितले की, जामनेर तालुक्यातील मालदाभाडी  येथे अत्याचारग्रस्त पिडीतेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. आज तिच्या कुटूंबियांची भेट घेतली. त्यांना शासनातर्फे मदतीचा ४ लाख १२  हजार ५०० चा धनादेश दिला. संशयितांवर कारवाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.  मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा  येथे मध्यप्रदेशातील यूवती काकाच्या लग्नाला आली होती. तिच्यावर अत्याचार करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. तिच्या कुटूंबियांचीही आज भेट घेवून शासनाच्या मदतीचा दोन लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.

 

यासोबतच पारोळा तालुक्यातील लोणी, चोपडा तालुक्यातील काही घटनांत अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे. त्याबाबत पोलिसांना योग्य ती कारवाईचे आदेश दिले आहेत. काही पिडीतांचे, कुटूंबियांचे पुनवर्सन करण्यासाठी त्यांना घरकुल योजनेसह इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

Exit mobile version